31 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारणपंजाबमध्ये ‘आप’चा धुव्वा, काँग्रेसला फायदा

पंजाबमध्ये ‘आप’चा धुव्वा, काँग्रेसला फायदा

ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल

Google News Follow

Related

काँग्रेस पंजाबमध्ये सन २०१९च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची शक्यता असून येथे १३पैकी सात ते नऊ जागा पक्ष जिंकेल, असे इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार समोर आले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाची (आप) कामगिरी निराशाजनक असेल. त्यांना शून्य ते दोन जागा मिळतील. भाजपला दोन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एकेकाळी या राज्यात प्रबळ पक्ष असणारा शिरोमणी अकाली दल (एसएडी) आपले खातेही उघडू शकणार नाही, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. अन्य पक्षांना शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत, काँग्रेसला एकूण मतदानाच्या ३१ टक्के, त्यानंतर भाजपला २६ टक्के, शिरोमणी अकाली दलाला २० टक्के, ‘आप’ला १८ टक्के आणि इतर पक्षांना पाच टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. न्यूज १८ मेगा एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला आठ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला दोन ते चार जागा मिळू शकतात. आप शून्य ते एक जागा जिंकेल, असा अंदाज आहे.

एबीबी सीव्होटरच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला सहा ते आठ जागा मिळू शकतात, तर एनडीएला एक ते तीन जागा आणि ‘आप’ला तीन ते पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान झाले. राज्यात आप, काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत.
सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या, तर शिरोमणी अकाली दल आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या. ‘आप’ला केवळ एकच जागा मिळाली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर, अमृतसर, खदूर साहिब, जालंधर, लुधियाना, भटिंडा आणि पटियाला हे मुख्य मतदारसंघ आहेत. गुरदासपूरमध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधवा हे ‘आप’चे अमनशेर सिंग, एसएडीचे दलजित सिंग चीमा आणि भाजपचे दिनेश सिंग यांच्या विरोधात लढत आहेत. अमृतसरमध्ये गुरजीत सिंग औजला (काँग्रेस), कुलदीप सिंग धालीवाल (आप), अनिल जोशी (शिरोमणी अकाली दल) आणि माजी राजदूत तरनजीत सिंग संधू (भाजप) हे रिंगणात आहेत.

हे ही वाचा:

सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा रद्द

आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा

बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का

गंगू नाचतो म्हणून नंगू नाचतो, अंदाजापेक्षा मोदींचे आकडे मोठे असतील

खदूर साहिबमध्ये, खलिस्तानी फुटीरतावादी अमृतपाल सिंग, जो सध्या आसामच्या दिब्रुगडमध्ये तुरुंगात आहे, तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे कुलबीर सिंग झिरा, ‘आप’चे लालजीत सिंग भुल्लर, शिरोमणी अकाल दलाचे विरसा सिंग वलटोहा आणि भाजपचे मनजीत सिंग मन्ना मियांविंड हे अन्य उमेदवार आहेत.
जालंधरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे चरणजित सिंग चन्नी हे ‘आप’चे पवनकुमार टीनू, शिरोमणी अकाली दलाचे मोहिंदर सिंग केपी आणि भाजपचे सुशील कुमार रिंकू यांच्या विरोधात लढत आहेत. लुधियानामध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग (काँग्रेस), अशोक पराशर पप्पी (आप), रणजित सिंग ढिल्लॉन (एसएडी) आणि रवनीत सिंग बिट्टू (भाजप) हे प्रमुख उमेदवार आहेत.

भटिंडातील प्रमुख उमेदवार शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, आपचे गुरमीत सिंग खुडियान, काँग्रेसचे जीत मोहिंदर सिंग सिद्धू आणि भाजपच्या परमपाल कौर सिद्धू यांच्यात लढत आहे.
पटियालामध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात धरमवीर गांधी (काँग्रेस), ‘आप’चे बलबीर सिंग आणि शिरोमणी अकाल दलाचे नरिंदर कुमार शर्मा लढत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा