गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. अखेर निवडणुकीच्या मतदानाचे सात टप्पे पार पडले असून एक्झिट पोलही समोर आले आहेत. अशातच आता राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोठा दावा केला आहे.
“गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.’एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य करताना केसरकर म्हणाले की, “महाराष्ट्रात निघालेले फतवे आणि उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे नुकसान झाले. मात्र, आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी
दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये यायचं आहे. त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मेसेज पाठवत आहेत. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा:
निवडणूक झाली, एक्झिट पोल्सही जाहीर आता नरेंद्र मोदी लागले कामाला
आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा
अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड
बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का
एबीपी माझा- सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २३, महायुतीला २४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ही लढाई बरोबरीची होणार असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ९ तर, अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.