देशातील लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सातही टप्पे यशस्वीरीत्या पार पडले असून आता निकालाची उत्सुकता असणार आहे. अशातच एक्झिट पोल्सही जाहीर झाले आहेत. एक्झिट पोल्सनुसार एनडीए सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे निकालाची उत्सुकता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशहिताच्या कामाला लागल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांदरम्यान त्यांनी सांगितले होते की निवडून आल्यानंतरचा १०० दिवसांचा रोड मॅप तयार आहे. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजानंतर आता नरेंद्र मोदी हे विविध बैठकांमध्ये व्यस्त असणार आहेत. विविध विषयांवर चर्चा करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सात बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकांमध्ये नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यासाठी विचारमंथन सत्र आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी बैठक समाविष्ट असेल.
ईशान्यकडील राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर, ते देशातील उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर ५ जून रोजी मोठ्या प्रमाणावर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एक बैठकही घेणार आहेत. तसेच नवीन सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यसूचीचा आढावा घेण्यासाठी ते एक दीर्घ विचारमंथन सत्र आयोजित करतील.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी २१ ते २३ जागांवर भाजपा
अमेरिकेच्या संघात भारताचा आवाज; कॅनडाविरोधात पारडे जड
बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का
एका तासात १८०० भाविकांना मिळणार केदारनाथाचे दर्शन
एक्झिट पोलनुसार एनडीएचे सरकार पक्के
भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम ठेवेल असा अंदाज शनिवारी एक्झिट पोलने वर्तवला आहे. प्रमुख एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए किमान ३५० जागा जिंकेल. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान शनिवारी संपले आणि देशव्यापी मतमोजणीचा भाग म्हणून मंगळवारी, ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.