दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावरचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना रविवार, २ जून रोजी रोजी तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळयाप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. दरम्यान, न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांची १० मे रोजी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. त्यांच्या जामिनाची मुदत २ जून रोजी संपत असून रविवारी त्यांना शरण जावे लागणार आहे. मात्र, तत्पूर्वी, केजरीवाल यांनी आपली खराब प्रकृती आणि वैद्यकीय चाचणीचे कारण देत अंतरिम जामीन आणखी सात दिवस वाढवण्याची विनंती केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली पण निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना उद्या पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळयाप्रकरणी जामीनावर बाहेर आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र, २ जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातून पळ काढण्यासाठी म्हणून अरविंद केजरीवाल यांची न्यायालयात धावाधाव सुरू होती. जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना दणका दिला. जामीन मिळावा यासाठी केजरीवालांनी राऊज एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीर म्हणजे विदेशी भूमी; चक्क पाकिस्तान सरकारची न्यायालयात कबुली
‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण
प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले
चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांनी रेग्युलर आणि अंतरिम दोन्ही जामीन याचिका दाखल केल्या. गुरुवार, ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी वेळी ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. यावेळी ईडीने भर न्यायालयात प्रश्न उपस्थित केला. जर अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खराब आहे तर ते इतक्या जोशात निवडणुकीचा प्रचार का करत आहेत?