24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेष‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

हातात तिरंगा असताना हृदयविकाराचा झटका

Google News Follow

Related

हातात तिरंगा आणि लष्कराची वर्दी, मागे ‘मां तुझे सलाम’ हे गाणे वाजतेय… प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत आहेत…. मात्र गाणे गाता गाताच माजी सैनिक व्यासपीठावर कोसळतो. मात्र अशाही परिस्थितीत ते तिरंग्याचा मान ठेवतात. तिरंगा दुसरा कोणीतरी घेतो आणि पुन्हा फडकू लागतो. टाळ्यांचा कडकडाट सुरूच असतो, मात्र सैनिक जमिनीवरच पडून असतात. श्वास तर चालू असतो. त्यामुळे प्रेक्षक त्याला अभिनय समजतात. मात्र जेव्हा प्रेक्षकांना समजते, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. माजी सैनिकाचे प्राण केव्हाच हे शरीर सोडून गेलेले असतात.

तिरंगा फडकवणरी व्यक्ती त्यांना हलवते, त्यांचे श्वास तपासते. मात्र काहीच प्रतिक्रिया येत नाही. काही लोक म्हणाले की, या माजी सैनिकाला मोठा नशीबवान मृत्यू मिळाला. ते वर्दीमध्ये होते. शेवटच्या क्षणापर्यंत तिरंग्याच्या सोबत होते. मात्र जेव्हा ते कोसळले तेव्हा प्रेक्षकांनी याकडे लक्ष का दिले नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यांना सीपीआर दिले असते किंवा रुग्णालयात नेले असते तर त्यांचा जीव वाचूही शकला असता.

ही घटना इंदोरच्या फूटी कोठी भागात घडली. जिथे योग क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात निवृत्त सैनिक बलजीतसुद्धा त्यांच्या टीमसह सादरीकरण करण्यासाठी पोहोचले होते. बलजीत बहुतेकदा अशा प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात आपल्या टीमसह देशभक्तीपर कार्यक्रम करत असत. ते इंदोरचेच रहिवासी होते.

हे ही वाचा:

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

चेन्नईहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवर मौलावीकडून बलात्कार

२०२४ मध्ये “इंडीया शायनिंग” होत नाही, त्याची सात कारणे

योग कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक हॉलमध्ये बसले होते आणि बलजीत सादरीकरण करत होते. कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर केली गेली. जेव्हा बलजीत व्यासपीठावर लष्कराच्या गणवेशात देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करत होते, तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते व्यासपीठावरच कोसळले. जेव्हा ते कोसळले तेव्हा प्रेक्षकांना वाटले की ते सादरीकरण करत आहेत आणि व्यासपीठावर पडणे हा त्या सादरीकरणाचाच भाग आहे. त्यानंतर जोरजोरांत टाळ्या वाजू लागल्या. त्याचवेळी व्यासपीठाखाली त्यांचा एक साथीदारही उपस्थित होता, ज्याच्या हातात तिरंगा होता. जेव्हा बलजीतने थोडा वेळ काहीच हालचाल केली नाही, तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन तपासले असता बलजीत बेशुद्ध पडले होते. त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनीही लगेचच उपचार करण्याची तयारी दर्शवली मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा