24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषज्येष्ठश्रेष्ठ क्रीडा पत्रकारांनी आठवले जुने दिवस!

ज्येष्ठश्रेष्ठ क्रीडा पत्रकारांनी आठवले जुने दिवस!

स्पोर्टस जर्नालिस्ट असो. ऑफ मुंबईतर्फे खास सत्कार, वेंगसरकरही रमले

Google News Follow

Related

गेल्या तीन चार दशकातील क्रीडापत्रकारितेचा इतिहास बुधवारी वानखेडे स्टेडियमच्या पीडी हॉलमध्ये एकवटला होता. स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वतीने जुन्याजाणत्या १८ क्रीडापत्रकारांचा विशेष सत्कार २९ मे रोजी करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध माध्यमांत काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांची मांदियाळी जमली.

पी. एम. शिरोडकर (१९६२), हॅरी डेव्हिड (१९६४), पीटर रॉड्रिग्ज (१९६९), रेमण्ड फर्नांडिस (१९७१), मुकेश पारपियानी (१९७३), जेमी बारडोलीवाला (१९७५), अँन्थनी अझावेडो (१९७६), एस.एस. रामस्वामी (१९७८), विनायक दळवी (१९७९), अय्याझ मेमन (१९७९), शरद कद्रेकर (१९७९), सतीश मिश्रा (१९७९), डेव्हिड डिसुझा (१९७९), सुहास जोशी (१९८०), एच. नटराजन (१९८०) यांच्यासोबत फ्रेडुन डीवित्रे, मकरंद वायंगणकर, द्वारकानाथ संझगिरी या मुक्त क्रीडा पत्रकारांचाही सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता.

भारताचे माजी कर्णधार आणि माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर आणि माजी ऑलिम्पियन ऍथलिट एडवर्ड सिक्वेरा यांच्या हस्ते या सर्व क्रीडा पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. शाल, मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यानिमित्ताने असोसिएशनने तयार केलेल्या ऑडिओ व्हीजुअलच्या माध्यमातून या क्रीडा पत्रकारांची जुनी छायाचित्रे, त्यांनी विविध खेळाडूंशी साधलेल्या संवादाची क्षणचित्रे पाहायला मिळाली. दिलीप वेंगसरकर, एडी सिक्वेराही या सगळ्या जुन्या दिवसांच्या आठवणीत चांगलेच रमले.

हे ही वाचा:

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

राजन यांची राहुल गांधींवर स्तुतीसुमने

बांगलादेशात हिंदू मुलावर मुस्लीम जमावाकडून जीवघेणा हल्ला

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

या सर्व पत्रकारांनी आपापल्या आठवणी सांगताना उपस्थित क्रीडा पत्रकारांनीही त्यांचे कौतुक केले आणि त्यांना दाद दिली. क्रीडा पत्रकारितेचे जुने दिवस, तेव्हाची वानखेडे स्टेडियमची स्थिती, आज बदललेले क्रीडापत्रकारितेचे वातावरण, तेव्हा केलेली मजा, केलेले दौरे अशा सगळ्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला. पी.एम. शिरोडकर हे तर वयाच्या नव्वदीतही त्यांच्या मुलासमवेत या कार्यक्रमात सामील झाले आणि त्यांना पाहून सर्वांनाच कौतुक वाटले.
यावेळी दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या तरुणपणात पत्रकारांनी कसे आपल्याला सहकार्य केले, कसा संवाद साधला याविषयी सांगितले.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत सरस

त्यानंतर टी-२० वर्ल्डकपविषयीही त्यांनी आपली मते व्यक्त केली. सूत्रसंचालक प्रसन्न संत यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली तेव्हा वेंगसरकर म्हणाले की, भारतीय संघाची क्षमता पाहता आपण यावेळी वर्ल्डकपमध्ये नक्कीच सरस ठरणार. ते म्हणाले की, के.एल. राहुल, शुभमन गिल, रिंकू सिंग य़ासारखे खेळाडू अंतिम १५ खेळाडूंत स्थान मिळवू शकत नाहीत, यावरून किती स्पर्धा खेळाडूंमध्ये आहे आणि आपली दुसरी फळी किती सक्षम आहे, याचा अंदाज यावा. २००७मध्ये खेळविल्या गेलेल्या पहिल्या टी-२० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा संघ वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने निवडला होता. तो वर्ल्डकप भारताने जिंकलाही होता.

वेंगसरकरांकडून २५००० रु.

वेंगसरकरांकडून यावेळी १९ वर्षांखालील युवा खेळाडूला २५ हजार रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले. स्पोर्ट्स जर्नालिस्ट असो. ऑफ मुंबईने असा मुंबईतील सर्वोत्तम युवा खेळाडू निवडावा आणि त्याला ही रक्कम दिली जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख आयोजन एसजेएएमच्या कार्यकारिणीने केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा