26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरअर्थजगतबोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते.. गुंतवणुकीवरून फडणवीसांचा ठाकरेंना टोला

बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते.. गुंतवणुकीवरून फडणवीसांचा ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आकडेवारी

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यात सत्तांतरानंतर विरोधकांकडून वारंवार राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप केला जात होता शिवाय राज्यातील परकीय गुंतवणूक घटली आहे, असंही बोललं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील परकीय गुंतवणूक वाढल्याचे चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी समोर आणत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे.

“थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक १ वर राहिला आहे. एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये क्रमांक १ वर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षातसुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने गुरुवार, ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात १,२५,१०१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या दोन्ही आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

राजधानीत भीषण पाणीबाणी…लोकांनी घेतला टँकरचा ताबा

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

एअर इंडियाच्या विमानात आठ तास एसीशिवाय; प्रवासी बेशुद्ध झाले

यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची कानउघाडणी केली आहे. बोलायला नाही तर कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते, अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा