24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'मोदी जेव्हा तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा हिशेब करेल'

‘मोदी जेव्हा तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा हिशेब करेल’

पंतप्रधान मोदींची होशियारपूरमधून गर्जना

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्पाचे मतदान २ जूनला होणार असून प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची सभा पंजाबमधील होशियारपूर या ठिकाणी पार पडली.होशियारपूरयेथील रामलीला मैदानावर पार पडलेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीवर जोरदार निशाणा साधला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, मैं अभी चुप बैठा हूं, जिस दिन मोदी मुंह खोलेगा तुम्हारी सात पीढ़ी का हिसाब निकाल कर बाहर रख देगा( मी आता शांत बसलो आहे, ज्या दिवशी मोदी तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर पडेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले, इंडी आघाडीचे लोक मला नवनवीन शिव्या देत आहेत. काँग्रेसने भ्रष्टाचारमध्ये डबल पीएचडी केली आहे.आता आम आदमी पार्टी देखील यामध्ये सामील झाली आहे.ते पुढे म्हणाले, काँग्रेसला भ्रष्टाचार करण्यामध्ये ७० वर्षांचा कालावधी लागला.परंतु आम आदमी पार्टीवाले भ्रष्टाचारी म्हणूनच जन्माला आले आहेत.निवडणुकीत त्यांनी ड्रग्जवर भाषण करून पंजाबची बदनामी केली आणि सरकार बनताच पैसा कमावण्यात ड्रग्जला आपला भागीदार बनवले. पंजाबमधील शेती आणि उद्योग उद्ध्वस्त झाले. महिला अत्याचारातही ते आघाडीवर आहेत.

हेही वाचा..

ड्रायव्हर बनला सीबीआय अधिकारी, केली फसवणूक!

बोरिवलीत सव्वा कोटीचे ‘हेरॉईन’ जप्त; दोघांना अटक

मणिशंकर अय्यर आपल्या क्षमतेप्रमाणे हवे ते बोलतात…काँग्रेसने हात झटकले

मणिशंकर अय्यर आपल्या क्षमतेप्रमाणे हवे ते बोलतात…काँग्रेसने हात झटकले

ते पुढे म्हणाले, इंडी आघाडीवाले ‘वीरांचे’ अपमान करत आहेत.यांनी बिपीन रावत यांना गल्लीतील गुंड म्हणून संबोधले होते.हा सेनेचा अपमान होता.एक वेळ मला शिव्या द्या परंतु देशाच्या सेनेचा अपमान मी कदापि सहन करणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.सभेत मोदींनी आदमपूर विमानतळाला गुरु रविदासांचे नाव देण्याची मोठी घोषणा केली. तसेच होशियारपूरमधून भाजपच्या उमेदवार अनिता सोमप्रकाश आणि आनंदपूर साहिबमधून सुभाष शर्मा यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा