23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापदमुक्त असतानाही डॉ. तावरेने ससूनमध्ये रक्त नमुने बदलले

पदमुक्त असतानाही डॉ. तावरेने ससूनमध्ये रक्त नमुने बदलले

आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा खुलासा

Google News Follow

Related

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नव्याने धक्कादायक खुलासे होत असतानाच आता ससून रुग्णालयातील आणखी एक संतापजनक बाब समोर आली आहे. ससून रुग्णालयात या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयातील तीन जणांना निलंबित देखील करण्यात आले होते. यावर आता आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही खुलासा केला असून कडक इशारा दिला आहे.

आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर सुनील तावरे याला अधीक्षकपदी नियुक्ती देण्याविषयीच्या पत्रावर शेरा मारला होता. आमदार सुनील टिंगरे यांनी २६ डिसेंबर २०२३ रोजी हे शिफारस पत्र त्यांना पाठवले होते. मात्र, ससून रुग्णालायत उंदीर चावून एकाचा मृत्यू झाला. त्यावेळी समिती नेमली होती. त्यावेळी डॉ. तावरे याच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्याला पदमुक्त केल्याचे मुश्रीफ म्हणाले. तावरे अधीक्षक नसूनही पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुना बदलण्याचे काम झाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तावरेसह इतर दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तावरेने दबाव टाकून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे. अशी चूक कोणाकडून होणार नाही, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

केवढा हा आत्मविश्वास… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीऐवजी आईचे घेतले रक्तनमुने!

हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

तसेच समितीच्या अहवालत विनायक काळे (डीन) यांच्यावर देखील निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. बाहेरचा हस्तक्षेप यापुढे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. दोषींवर कारवाई करणार, कितीही मोठा व्यक्ती असला तरी कारवाई केली जाईल, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा