24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआत्मविश्वास असावा तर असा... नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

आत्मविश्वास असावा तर असा… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!

संपूर्ण आराखडा तयार, हजारो लोक होणार सहभागी

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूक-२०२४ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून ४ जून रोजी सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे तर संध्याकाळपर्यंत नव्या सरकारचे चित्रही स्पष्ट होणार आहे. या सगळ्या गदारोळात एनडीएकडून सरकार स्थापनेची तयारी सुरु करण्यात आली आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एनडीए निवडणुक जिंकून पुन्हा सत्तेत आल्यास पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा कर्तव्यपथावर आयोजित केला जाणार आहे.हा सोहळा ९ जूनला पार पडणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.विशेष म्हणजे या सोहळ्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही याचे संकेत दिले आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जर निवडणुकीचा निकाल एनडीएच्या बाजूने लागला तर ९ जून रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन लोकांनी याची पुष्टी केली आहे. या संभाव्य सोहळ्यासाठी तात्पुरता आराखडा गेल्या महिन्यात तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.यापूर्वी दोन्ही प्रसंगी (२०१४-२०१९) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता.मात्र, भाजपाला यावेळी कर्तव्यपथावर हा सोहळा आयोजित करायचा आहे.या संदर्भात २४ मे रोजी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाची बैठकही झाली होती. या महत्त्वाच्या बैठकीत आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शपथविधी सोहळ्याच्या कव्हरेजबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

पुणे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीऐवजी आईचे घेतले रक्तनमुने!

हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा एक दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या लष्कराला चीनची मदत!

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यापूर्वी याचे संकेत दिले आहेत.वास्तविक, १० जून हा त्यांच्या पक्षाचा स्थापना दिवस आहे. परंतु, शपथविधी समारंभात व्यस्त असल्याने यावेळी पक्षाचा स्थापना दिवस साजरा करणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांना सांगितले होते.त्यामुळे ९ जूनला पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएने विजय मिळवला, तर शपथविधी समारंभ कर्तव्यपथावर आयोजित करण्याची योजना आहे. आता प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सोहळ्यासाठी कार्तव्य पथ (पूर्वीचा राजपथ) ही पहिली पसंती का? यावेळी सूत्रांनी सांगितले की, एनडीए अशा जागेचा शोध घेत आहे जिथे जास्तीत जास्त लोक या सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकतील आणि त्याचवेळी विकसित भारताचे चित्रही देशातील आणि जगाच्या लोकांना पाहता येईल. ‘कर्तव्य पथ हा महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे’. या प्रकल्पाचे बांधकामही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे, त्यामुळे येथे शपथविधी सोहळा आयोजित केल्यास विकसित भारताची झलक लोकांना पाहता येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा