पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीएनएन -न्यूज-१८ ला दिलेल्या मुलाखतीत संदेशखळीच्या महिलांचे कौतुक केलं आहे.संदेशखालीच्या महिलांनी पुढे येऊन धैर्य दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांना सलाम केला आहे.’महिला आरक्षण आणि सक्षमीकरण हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि आम्ही या दिशेने काम करत आहोत’, असे पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी संदेशखालीच्या सर्व बहिणींच्या चरणांना स्पर्श करतो.त्यांनी वैयक्तिक सन्मानाची पर्वा केली नाही, त्याचे परिणाम काय होतील याची पर्वा केली नाही आणि एवढ्या मोठ्या कटाचा त्यांनी पर्दाफाश केला.’आम्ही महिलांच्या सुरक्षेचा विचार करून खूप काही केले आहे. बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
हे ही वाचा:
उत्तर भारतात उष्म्याचा कहर; दिल्लीत तापमान ५० अंश सेल्सिअसजवळ!
राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!
‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!
ते पुढे म्हणाले, ‘लाल किल्ल्यावरून माझ्या पहिल्या भाषणात मी समाजात महिलांच्या बाबतीत आवश्यक बदलांबद्दल बोललो होतो. बंगालमधील महिला आज असुरक्षित वाटत आहेत, त्यांना सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.तृणमूल काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांच्याकडे आता कोणतेही मुद्दे नाहीत.ते आता दिवाळखोर झाले आहेत.मतांसाठी धर्माच्या आधारे विभाजन करण्याचे काम हे करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, संदेशखालीतील रहिवासी असणाऱ्या रेखा पत्रा या तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याच्या विरोधातील महिला आंदोलनाच्या चेहरा होत्या.तसेच त्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत.पंतप्रधान मोदी यांनी रेखा पत्रा यांच्याशी संवाद साधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेबद्दल जाणून घेतले होते आणि तिला ‘शक्ती स्वरूप’ असे संबोधून तिचे कौतुक केले होते.दरम्यान, लैंगिक छळाचा आरोप असणारा टीएमसी नेता शाहजहान शेख सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.शाहजहान शेखच्या ठिकाणावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे.तसेच ईडीने नुकतेच त्याच्याविरुद्ध जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये शेख शाहजहानने ९० एकर जमीन बळकावून २६१ कोटी रुपये कमावले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते.