विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे.किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी खडी, विटा वाहून नेणारी बोट काल(२७ मे) रात्री ८ च्या सुमारास समुद्रात कलंडली.या बोटीमध्ये एकूण १२ जण होते.त्यापैकी ११ जणांना वाचवण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.संतोष मुकने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी खडी आणि विटा घेऊन जाणारी ही बोट कलंडली.या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असणारी बोट समुद्रातच कलंडली.या बोटीत एकूण १२ जण होते.या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर ११ जणांना वाचवण्यात यश आले.या बोटीमागून येणाऱ्या एका बोटीने ११ जणांचे प्राण वाचवले.तर एकाचा शोध सुरु होता.
हे ही वाचा:
गुरुमित राम रहीम सिंगसह चौघांची निर्दोष मुक्तता
तेलंगणाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघातात मृत्यू
केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार
अभिनेता रणदीप हुड्डाने अंदमानला घेतले सावरकरांचे दर्शन!
या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली.कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर आणि खासगी बोटीच्या सहाय्याने बेपत्ता असलेल्या संतोष मुकने व्यक्तीचा शोध घेण्यात आला.अखेर २४ तासानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.पावसाळ्यापूर्वी किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीसाठी ही बोट खडी आणि विटा नेत असताना हा अपघात झाला.