28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० कामगारांचा मृत्यू

मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० कामगारांचा मृत्यू

अनेकजण बेपत्ता; युद्धपातळीवर शोधकार्य सुरू

Google News Follow

Related

‘रेमल’ चक्रीवादळाचा तडाखा काही राज्यांना बसत असतानाच वादळामुळे मुसळधार पाऊस देखील सुरू आहे. मिझोराममधील ऐझॉल शहरातील दगडी खाण कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १० खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमल’ने पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि आता मिझोराममध्ये हाहाःकार उडवून दिला आहे. रेमल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मिझोरामधील ऐझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवरील मेल्थम आणि ह्लिमेन दरम्यानच्या भागात असलेली दगडी खाण कोसळून सकाळी ६ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मंगळवारी सकाळी मुसळधार पावसात ही खाण कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला, अनेक बेपत्ता झाले, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारतीय संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या युट्यूबर कॅरोलिना गोस्वामीला ध्रुव राठीच्या चाहत्यांकडून बलात्काराच्या धमक्या!

बोनेटवर बसून बीएमडब्ल्यूची सफर करणाऱ्याला अटक, चालकाचे वडीलही ताब्यात!

इस्रायलचे नेत्यानाहू म्हणतात, क्षेपणास्त्र डागली, चूक झाली!

एनआयएची मोठी कारवाई; परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी उध्वस्त

मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तथापि, इतर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संततधार पावसामुळे बचाव कार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले. तर, घटनास्थळावरून सुटका करण्यात आलेल्यांना पुढील उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हुंथर येथे राष्ट्रीय महामार्ग ६ वर भूस्खलन झाल्यामुळे ऐझॉलचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे, अशी माहिती आहे. तसेच भूस्खलनामुळे विविध आंतरराज्य महामार्गही विस्कळीत झाले आहेत, असेही ते म्हणाले. पावसाच्या हजेरीमुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा