दक्षिण गाझा शहर रफाह येथे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांच्या तंबूच्या छावणीला आग लागल्यानंतर किमान ४५ मारले जाणे, ही ‘दु:खद चूक’ असल्याची कबुली इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली आहे.हमासविरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला आंतरराष्ट्रीय टीकेचा सामना करावा लागला आहे. त्याच्या काही जवळच्या मित्र राष्ट्रांनी, विशेषत: अमेरिकेने नागरिकांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला आहे. इस्त्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे युद्धातील पॅलेस्टिनी मृतांची संख्या ३६ हजारांवर पोहोचली आहे.
‘निष्पाप नागरिकांना इजा होऊ नये, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न असूनही, काल रात्री एक दुःखद चूक झाली,’ असे नेतान्याहू यांनी सोमवारी इस्रायलच्या संसदेला संबोधित करताना सांगितले. ‘आम्ही घटनेचा तपास करत आहोत आणि त्याचा निष्कर्ष काढू, कारण हे आमचे धोरण आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.तेल अल-सुलतानच्या वायव्य भागात घटनास्थळी धाव घेणारे मोहम्मद अबुअसा म्हणाले की, बचावकर्त्यांनी असह्य अवस्थेतील लोकांना बाहेर काढले. आम्ही तुकडे झालेल्या मुलांना बाहेर काढले. आम्ही तरुण आणि वृद्ध लोकांना बाहेर काढले. छावणीत लागलेली आग भयंकर होती, असे तो म्हणाला.
हे ही वाचा:
ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती
‘केजरीवाल संधीसाधू, दिग्विजय अनुभवशून्य’
पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर नाही, तर तुमच्यावर फुटणार.. खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार!
ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?
गाझा आरोग्य मंत्रालय आणि पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट बचाव सेवेने दिलेल्या माहितीनुसार, किमान ४५ जण ठार झाले. मंत्रालयाने सांगितले की मृतांमध्ये किमान १२ महिला, आठ मुले आणि तीन वृद्धांचा समावेश आहे आणि आणखी तीन मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत.इजिप्तच्या लष्कराने सांगितले की, राफा भागात झालेल्या गोळीबारादरम्यान त्यांच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. तर, ते इजिप्शियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून दोन्ही बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे इस्रायलतर्फे सांगण्यात आले.
इजिप्तच्या सीमेवरील दक्षिणेकडील गाझा शहर राफा येथे दहा लाखांहून अधिक लोक राहत होते – गाझाच्या लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या प्रदेशाच्या इतर भागातून विस्थापित झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला इस्त्रायलने तेथे घुसखोरी सुरू केल्यापासून बहुतेकांनी पुन्हा एकदा पळ काढला आहे. शहर आणि आजूबाजूला शेकडो हजारो लोक तंबूच्या छावण्यांमध्ये आश्रायला आहेत.