26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषअग्निवीरांना आता मिळणार करसवलतीचा लाभ

अग्निवीरांना आता मिळणार करसवलतीचा लाभ

चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर अग्निवीर योजनेत जमा झालेली सुमारे १०.०४ लाख रुपयांची रक्कम आणि व्याज मिळेल.

Google News Follow

Related

प्राप्तिकर विभागाने आयटीआर फॉर्म- १मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम अग्निवीरांवर होईल. अर्जात नवीन खंड कलम सीसीएचला समाविष्ट केले आहे, ज्या माध्यमातून अग्निवीर त्यांच्या सेवा निधी फंडावर करसवलतीचा लाभ घेऊ शकतील. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कलमानुसार, जे अग्निपथ योजनेत नामांकित आहेत आणि जे १ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यानंतर अग्निवीर फंडात निधी जमा करतील, त्यांना या करसवलतीचा लाभ घेता येणार आहे.
या बदलाला समायोजित करण्यासाठी आयटीआर-फॉर्म १मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे करदात्यांना कलम ८०सीसीएच अंतर्गत करसवलतीसाठी पात्र निधीबाबत नमूद करता येईल.

दोन्ही करव्यवस्थांमध्ये लाभ मिळेल

कलम ८० सीसीएच अंतर्गत मिळणारी करसवलत नव्या आणि जुन्या अशा दोन्ही करव्यवस्थेमध्ये लागू असेल. ही करसवलत कलम ११५ बी अंतर्गत असेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि पुढील आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न दाखल करतेवेळी अग्निवीर कलम ८० सीसीएच अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळेल.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणूक निकालाआधी ‘इंडी’ गट अंदाज घेणार

प्रज्वल रेवन्ना भारतात येतोय… ३१ मे ला चौकशीसाठी हजर राहणार

अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

दिवाळी पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके?

सेवा निधी फंडावर कर नाही

चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर अग्निवीर योजनेत जमा झालेली सुमारे १०.०४ लाख रुपयांची रक्कम आणि व्याज मिळेल. प्राप्तिकर अधिनियम कलम १० मध्ये नवीन भाग जोडून कॉर्पस फंडातून मिळणाऱ्या रकमेवर कर लागणार नाही. म्हणजे अग्निवीर योजना २०२२ अंतर्गत नामांकित झालेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या नॉमिनीला अग्निवीर सेवा निधी फंडावर मिळणाऱ्या निधीवर प्राप्तिकरातून सूट मिळेल. त्यामुळे अग्निवीर सेवा निधी फंडाला सवलतीचा दर्जा मिळणार आहे.

काय आहे अग्निवीर कॉर्पस फंड

केंद्र सरकारने १४ जून २०२२ रोजी संरक्षण दलाच्या तीन शाखा- लष्कर, नौदल आणि हवाई दलात मोठ्या संख्येने तरुणांची भर्ती व्हावी, यासाठी अग्निपथ भर्ती योजना सुरू केली होती. या अंतर्गत तरुणांना चार वर्षे सेवा करण्याची संधी दिली जाते. अग्निवीरांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी अग्निवीर कॉर्पस फंड दिला जातो, ज्याचे व्यवस्थापन संरक्षण मंत्रालय करते. यामध्ये अग्निवीरांना त्यांच्या मासिक उत्पन्नातून ३० टक्के निधी या फंडमध्ये टाकणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारही समान निधीचे योगदान देते. यामध्ये सरकारच्या योगदानाला अग्निवीरांचे उत्पन्न समजले जाते, ज्यावर कर देय असतो. योजनेच्या सुरुवातीला अग्निवीर कॉर्पस फंडातील योगदानावरीर करात सवलत देण्याचा प्रस्ताव होता. त्याशिवाय, सेवेच्या शेवटच्या वर्षात मिळणाऱ्या आर्थिक पॅकेजमध्येही करात सवलत देण्याचा प्रस्ताव होता. नंतर त्यातून दिलासा देण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा