पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी विशाल अग्रवालसह इतर आरोपींना देखील १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.आरोपी विशाल अग्रवालच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे पुणे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी आरोपी विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलसांनी सात दिवसीय पोलीस कोठडी मागितली.मात्र, पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांची सात दिवसीय मागणी फेटाळत आरोपींची तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली.२४ तारखेपर्यंत आरोपीना पोलीस कोठडी सुनावली होती.आज याचा कालावधी संपल्यानंतर पुणे कोर्टात तिघांनाही हजर करण्यात आले.
हे ही वाचा:
गाडी अल्पवयीन तरुणचं चालवत होता, अपघातावेळी गाडीचं स्टीयरिंग वेदांतच्या हाती!
अरविंद केजरीवाल यांच्याकडून बिभव कुमारचा बचाव; हल्ल्याच्या वेळी ते घरीच होते
डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणातील फरार कंपनी मालकास अटक!
अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी सावत्र पित्याला फाशी
पुणे पोलिसांनी चौकशीसाठी आज पुन्हा विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागितली.मात्र, न्यायालयाने त्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आणि न्यायालयाने विशाल अग्रवालसह इतर आरोपींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यामुळे आरोपी विशाल अग्रवालचा जामिनासाठी अर्ज करण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे.