डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.एमआयडीसी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक आहेत.दुर्घटना झाल्यानंतर आरोपी मालती मेहता फरार होत्या.पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अमुदान कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाला.ही दुर्घटना गुरुवारी(२३ मे) दुपारच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.दरम्यान, एमआयडीसीतील रिअॅक्टर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेनंतर कंपनीचे फरार होते.
हे ही वाचा:
अभिनेत्री लैला खान हत्याकांड प्रकरणी सावत्र पित्याला फाशी
बांगलादेशी खासदाराच्या शरीराचे तुकडे केले, सुटकेसमध्ये भरले…खुन्याला अटक
पुण्यातील प्रकरण सदोष मनुष्यवधाचे; म्हणून लावले ३०४ कलम!
छत्तीसगडमध्ये ८ नक्षलवाद्यांना टिपले, चकमक सुरू!
कंपनीचे मालक नाशिकला फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत मालती मेहता यांना अटक केली.नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत याची माहिती दिली.पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हणाले की, डोंबिवली येथील एमआयडीसी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला नाशिक मधून अटक करण्यात आली आहे.आरोपीने नाशिक मधील आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता.नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत कंपनी मालकास अटक करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.