‘हमारे बारह’ या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला. मुस्लिमांमधील महिलांचे होणारे शोषण, त्यांच्यात असलेला शिक्षणाचा अभाव, घरगुती अत्याचार या मुद्द्यांवर हा चित्रपट आहे. त्यावरून काही कट्टरतावादी मुस्लिमांनी सोशल मीडियावर दिग्दर्शकाला धमक्या दिल्या आहेत. सर तन से जुदाच्या या धमक्या आहेत. ऑप इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
एरर 404 या नावाने अशा धमक्या देणाऱ्या पोस्ट दाखवून पोलिसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
खादीम हुसेन रिझवी ज्याने तेहरिक ए लब्बएक पाकिस्तान या संघटनेची स्थापना केली त्याने आणि मुफ्ती सलमान अझहरी यांनी सोशल मीडियाचा विशेषतः इन्स्टाग्रामचा वापर करून या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
इस्लामिक स्टेट अर्थात आयसीसच्या माध्यमातून करण्यात आलेले शिरच्छेद व्हीडिओ रुपात शेअर करण्यात आले आहेत. हे धमकी देणारे मुंब्रा भागातील असून त्यांचा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एसडीपीआय या संघटनेशी संबंध आहे, हे समोर आले आहे.
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अन्नू कपूर यांच्याविरोधात मुस्लिमांना भडकवण्यात येत असून मुस्लिमांनी कपूर यांना त्यांची जागा दाखवावी अशा धमक्या देण्यात येत आहेत.
हे ही वाचा:
‘देशभक्त मनोज तिवारींच्या विरुद्ध तुकडे-तुकडे गँगचा लीडर कन्हैया कुमार’
चाय-बिस्कुटांनो आता तरी विश्वास ठेवाल?
राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावर केलेल्या विधानाने न्यायव्यवस्थेला ओढले!
“काँग्रेसला दिलेलं मत व्यर्थ; सात जन्मातही सत्ता येणार नाही”
चित्रपट निर्मात्यांचा फोन नंबर शेअर करत त्याला धमक्या देण्यात येत आहेत. जर चित्रपट रिलीज करण्यात आला तर चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करण्यात येईल अशी धमकी देत आयसीसने जारी केलेले शिरच्छेदाचे व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत.
झी म्युझिकवर सायबर हल्ला करण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली आहे. मुफ्ती सलमान अझहरी हा भारतातील कट्टरतावादी आहे. राममंदिर निर्माणानंतर त्याने गरळ ओकत मुस्लिम कधीतरी सत्तेवर येतील अशा वलग्ना केल्या होत्या.