काँग्रेसचे माजी आमदार हरमिंदर सिंग जस्सी यांनी गुरुवारी( २३ मे) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचा भाजपमध्ये समावेश करून घेतला.दिल्लीतील भाजप कार्यालयात केला पक्ष प्रवेश.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरमिंदर सिंग जस्सी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशाची ज्या प्रमाणे प्रगती होत आहे.विदेशात सुद्धा भारताचा डंका वाजत आहे.पंतप्रधान मोदींच्या कामामुळे हे सर्व शक्य झाले.पंतप्रधान मोदींचे बऱ्याच वषांपासून मी काम बघत आहे.पंतप्रधानांनी जगात निर्माण केलेली प्रतिमा पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे हरमिंदर सिंग जस्सी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
राहुल गांधी यांनी जातीच्या आधारावर केलेल्या विधानाने न्यायव्यवस्थेला ओढले!
“पोलिसांनी पॉलीग्राफ चाचणी करावी म्हणजे सर्व चित्र स्पष्ट होईल”
हमासने अपहरण केलेल्या इस्रायली महिला सैनिकांवरील अत्याचाराचा नवा व्हीडिओ समोर
डोंबिवली आगीची परिस्थिती नियंत्रणात, ४ मृत्यू!
हरमिंदर सिंग जस्सी पंजाबमधील तलवंडी साबो येथून आमदार राहिले आहेत. जस्सी हे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा जवळचा मानला जातात.ते दोनदा तळवंडी साबो मतदार संघातून आमदार राहिले आहेत.तसेच हरमिंदर सिंग जस्सी हे पंजाबमध्ये मंत्रीही राहिले आहेत.
दरम्यान, हरमिंदर सिंग जस्सी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भटिंडामध्ये पक्षाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये भटिंडा सीटचाही समावेश आहे. जिथून भाजपने परमपाल कौर सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे.