लोकसभेच्या निवडणुकांचे पाच टप्पे पार पडले आहेत. दोन टप्पे शिल्लक आहेत. नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे भाकीत नामांकीत वृत्तवाहीन्या करतायत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र अजून आशावादी आहेत. देशातील काही राज्यात भाजपाच्या जागा कमी होतील, काँग्रेसच्या वाढतील असे ते म्हणतायत. एनडीएला बहुमत मिळाले नाही तर, आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रय़त्न करू असा दावा त्यांनी केलेला आहे. राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, समजण्या इतपत पवार चतुर आहेत, तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तळी का उचलतायत, असा प्रश्न अनेकांना पडलाय.