अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचे पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालने पोलीस कोठडीत कबूल केलं आहे.तसेच आरोपी विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची देखील गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे.
पुणे कार अपघात प्रकरणी काल आरोपी विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलसांनी सात दिवसीय पोलीस कोठडी मागितली.मात्र, पुणे सत्र न्यायालयाने पोलिसांची सात दिवसीय मागणी फेटाळत आरोपींची तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली.२४ तारखेपर्यंत आरोपीना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तसेच आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सीतारामन म्हणतात, एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार!
पुण्यासारखीच जळगावात घटना, अपघातात चार जणांचा मृत्यू, आरोपी मोकाट!
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या
निफ्टी २३ हजार जवळ, सेन्सेक्सची १ हजार अंकांनी उसळी!
दरम्यान, आरोपी विशाल अग्रवालची पोलीस चौकशी सुरु आहे.अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली अशी कबुली विशाल अग्रवाल याने पोलिसांसमोर दिली आहे. पोलिसांच्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवालने कबुली देताना अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचं म्हटलं आणि झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल याने खंतही व्यक्त केली.यासह विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची देखील गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे.विशेष म्हणजे सुरेंद्र कुमार अग्रवालचे छोटा राजन कनेक्शन असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबियांची चौकशी सुरु केली आहे.