मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात बुधवारी (२२ मे) पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने लाखो रुपयांच्या दारूवर बुलडोझर चालवला आहे. बरेला पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या अमझर खोऱ्याजवळ पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे.यावेळी पथकाने तब्बल सुमारे दीड लाख लिटर दारू नष्ट केली आहे.
यासंदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यकांत शर्मा म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पोलीस विभागाने शहरातील ३६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांची अवैध दारू जप्त केली होती.या संदर्भात न्यायालयाने अनेक प्रकरणे निकाली काढली होती.
हे ही वाचा:
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
मध्य प्रदेशात निकाहमध्ये घूमर पाहिल्यानंतर मौलवी संतप्त!
रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपये सर्वोच्च लाभांश मंजूर!
करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
दरम्यान, अलीकडेच एसपी आदित्य प्रताप सिंह यांनी जप्त केलेली अवैध दारू नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला होता. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंदाजे १ लाख ४७ हजार लिटर दारू नष्ट करण्यायोग्य असल्याचे आढळून आले.यानंतर जिल्हा प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके तयार करून अवैध दारू नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले.
आदेशानुसार संयुक्त पथकाने शहरापासून दूर असलेल्या निर्जन भागात जाऊन दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर चढवत दारू नष्ट केली.या प्रक्रियेदरम्यान दारूच्या बाटलीची काच फुटल्यानंतर कुणालाही इजा होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली.तसेच प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये असलेली देशी दारू खड्ड्यात ओतून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.