नुकताच भारत आणि इराणने इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठीचा करार झाला आहे. दहा वर्षांसाठी हा करार झाला असून या बंदराच्या माध्यमातून भारताचा मध्य आशियाशी व्यापार वाढविण्यास मदत होणार आहे. या करारामुळे अनेक देशांना धक्का बसला आहे तर या करारानंतर काही देशांनी भारताचे कौतुक करत पाठींबा दर्शवला आहे.
इराणचे चाबहार बंदर १० वर्षांसाठी भारताकडे सोपवण्यात आल्याचे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने जोरदार स्वागत केले आहे. व्यापारासाठी अफगाणिस्तानला पर्याय मिळेल आणि त्यांचे पाकिस्तानच्या कराची बंदरावरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास तालिबान सरकारने व्यक्त केला आहे. तालिबानने भारताच्या या निर्णयाचे उघडपणे समर्थन केले असून यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये आर्थिक स्थैर्य येईल आणि त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
मध्य प्रदेशात निकाहमध्ये घूमर पाहिल्यानंतर मौलवी संतप्त!
रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपये सर्वोच्च लाभांश मंजूर!
करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद म्हणाले की, “आम्ही सर्व देशांशी चांगले आर्थिक संबंध ठेवण्याच्या बाजूने आहोत आणि चाबहार बंदराचा विस्तार केला पाहिजे. चाबहार बंदरात जेवढी अधिक गतिविधी वाढेल, तेवढी आर्थिक स्थिरता या क्षेत्रात येईल. याचा अफगाणिस्तानला फायदा होईल आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. चाबहार बंदर हा एक परिवर्तनकारी प्रकल्प आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानचे कराची बंदरावरील अवलंबित्व कमी होईल.” अफगाणिस्तानने इराणच्या बंदरांचा वापर केला तर पाकिस्तानचे लाखो डॉलर्सचे नुकसान होमार आहे. सुविधा देण्याच्या नावाखाली पाकिस्तान लुट करत असल्याचा आरोप अफगाणिस्तानने वारंवार केलेला आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.