देशात कोरोनाचा कहर वाढलेला असताना जनसामान्यांना या कोरोनावरील उपचारांच्या खर्चाची चिंता भेडसावत आहे. मात्र पगारदार नोकरीपेशा वर्गासाठी यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या नोकरदारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते असेल त्यांना या खात्यातून कोविड उपचारासाठी पैसे काढता येणार आहेत किंवा आरोग्याच्या कारणास्तव कर्ज घेता येणार आहे.
हे ही वाचा:
आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज
आयसीएसईचा १०वी आणि १२वीच्या परिक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे या बाबत नियमावली जाहिर करण्यात आले आहे. त्यानुसार आरोग्याशी निगडीत आणीबाणी, घर बांधणी अथवा खरेदी, घर दुरूस्ती, घराच्या कर्जाची परतफेड किंवा विवाह सोहळा यासाठी या खात्यातून पैसे काढता येणार आहेत.
ईपीएफमधून पैसे काढण्यासाठीच्या शर्ती
- आपल्या घरातील, परिवारातील सदस्य, मुले, पालक, किंवा स्वतः कोविडमुळे आजारी पडल्यास वैद्यकीय उपचारांसाठी ईपीएफमधील पैसे काढता येणार आहेत.
- कर्मचारी स्वतःच्या मासिक पगाराच्या किंवा कर्मचाऱ्याच्या व्याजासहीत एकूण पुंजीच्या सहा पट (जे कमी असेल) तेवढी रक्कम काढता येईल.
या प्रकारे पैसे काढताना लॉक-इन कालमर्यादा किंवा कमीत कमी सेवा मर्यादा लागू होणार नाही.
पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- कर्मचाऱ्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (युएएन) हवा.
- ईपीएफ खाते आणि बँकेचे खाते यांचे तपशील एकसारखे हवे
- ईपीएफमधून काढले जाणारे पैसे, तिसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात थेट दिले जाऊ शकत नाहीत.
- आपल्या वडिलांचे नाव आणि कर्मचाऱ्याची जन्मदिनांक आपल्या ओळखपत्रावरील महिती अचूकतेने जुळली पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे