पुण्यात पोर्श कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने आता मोठी कारवाई केली आहे.पुण्यातील बेकायदा पबवर पुणे महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील बेकायदेशीरपणे बांधलेल्या पबवर ही कारवाई केली जात आहे.’वॉटर्स आणि ओरेला पब’ असे कारवाई करण्यात आलेल्या पबचे नाव आहे.
कारवाई करण्यात आलेला हा तो पब नाहीये, ज्या ठिकाणी हिट अँड रन केसमधील आरोपी वेदांत अग्रवाल दारू प्यायला बसला होता.मात्र, त्याच्या आसपास हा पब असून पुणे महापालिकेने कारवाई केली आहे.याबाबत माहिती देताना पुणे महापालिकेचे उपअभियंता योगेन्द्र सोनावणे यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत दोन पबवर कारवाई केली असून पुढील कारवाई सुरू आहे. आज आम्ही ५ बेकायदा बार आणि पबवर कारवाई करणार आहोत, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
आगरतळा रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी नागरिकांना अटक!
‘प्रभू रामांच्या हाती १३ किलो चांदीचे धनुष्यबाण’
बाल गुन्हेगारी कायद्यातील तरतुदी अपुऱ्या, गुन्हेगार धार्जिण्या ?
गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार दोन रेस्टॉरंट्स सील केले आहे, ज्यामध्ये आरोपी वेदांत अग्रवाल दारू प्यायला बसला होता त्या रेस्टॉरंट्सचा समावेश आहे.दरम्यान, पुणे हिट अँड रन केसमधील आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील आरोपी विशाल अग्रवाल याला आज पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.