30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामापुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

यापूर्वी एका प्रकरणात घेतली होती अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मदत

Google News Follow

Related

पुण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाचं या पुणे कार अपघाताची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेदांत अग्रवाल हा गाडी चालवत होता तर तो अल्पवयीन असल्यामुळे त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. गाडी बाबतचे धक्कादायक खुलासे बाहेर आल्यानंतर आता या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भात माहिती दिली आहे.

व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे. पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे.

संपत्तीच्या वादात वेदांत याच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात आल्याची देखील चर्चा आहे. या प्रकरणात आरोप पत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवालच्या वडिलांना अटक झाली नव्हती. मोक्का लावणं अपेक्षित असताना देखील आयपीसी सलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती आहे. २००७-०८ मधील हे प्रकरण आहे. वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी पोर्शे गाडी ताशी २०० किलोमीटर वेगाने जात होती. आरोपी अल्पवयीन होता शिवाय त्याच्याकडे लायसन्स नव्हते, त्याने गाडी चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले नव्हते. गाडीचीही नोंदणी झालेली नव्हती. चालकाचे वडील विशाल हे ब्रह्मा रियल्टी नावाची कंपनी चालवतात. आरोपी अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो पार्टी करून परतत होता. या अपघातानंतर तेथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणही केली.

हे ही वाचा:

भाजप ३०० जागा पार करेल, पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी नाही!

संथगती मागचे सत्य, बिघाडा मागचा बोभाटा…

पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेला निर्णय धक्कादायक

‘ठाकरे कुटुंबीय ४ जूननंतर लंडनला पळण्याच्या तयारीत’

आरोपी वडिलांवर आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्शे चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या मुलांना ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवायला दिली हा निष्काळजीपणा आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली जात होती त्या पबवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि पबवरही अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा