बुलढाण्यातील सिंदखेडचे राजा लखुजी जाधव यांच्या समाधी समोर जीर्णोद्धाराचे काम सुरु असताना उत्खनन करताना पूर्व मुख्य शिवमंदिर सापडले आहे.हे शिव मंदिर तेराव्या शतकातील यादव कालीन असल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय पुरातत्व विभागाला याची माहिती मिळताच त्यांच्याकडून शिव मंदिराची पाहणी करण्यात आली असून पुढील कामकाज पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली होणार आहे.
राजे लखोजी जाधव यांच्या समाधीसमोर जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं, त्या दरम्यान हे तेराव्या शतकातील यादवकालीन मंदिर सापडलं.दगडी बांधकाम असलेल्या या शिव मंदिराची पुरातत्त्व विभागाच्या अधिक्षकांनी पाहणी केली. या परिसरात काही पुरातत्त्व वस्तू सापडण्याची शक्यता असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितले.
हे ही वाचा:
भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ‘आप’ कार्यकर्त्यांवर एफआयआर!
स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून एसआयटी !
७७ वर्षातील ऐतिहासिक घटना; निकोबारमधील शोम्पेन समाजाने पहिल्यांदा केलं मतदान
बारावीच्या निकालात मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के
भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी सांगितले की, उत्खननाचे काम करत असताना दगडी बांधकाम असलेलं शिव मंदिर सापडले.ते तेराव्या शतकातील यादव कालीन मंदिर असल्याचे दिसून येत आहे.या सापडलेल्या पुरातत्त्व मंदिराचा सखोल अभ्यास करणार आहे, असे अरुण मलिक यांनी सांगितले.दरम्यान, यापुढे आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली उत्खननाचं काम सुरू करण्यात आले आहे.