भारतात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून यासाठीचे पाच टप्पे यशस्वी पार पडले आहेत. देशात यंदा सात टप्प्यात मतदान होतं आहे. याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच यंदाच्या मतदान प्रक्रियेत एक ऐतिहासिक घटना घडली आहे. अंदमान निकोबार बेटांवर असलेल्या शोम्पेन समाजाच्या लोकांनी पहिल्यांदाच मतदान केलं आहे. या घटनेचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे.
अंदमान निकोबार बेटांवर शोम्पेन समाज वास्तव्य करत आहे. आता देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या इतक्या मोठ्या काळात या समाजाला निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळाली नव्हती. यंदा मात्र या समाजातील लोकांनी मतदान करून या ७७ वर्षातील ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे.
शोम्पेन समाजाच्या लोकांनी यंदा पहिल्यांदा मतदान केलं आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निवास्थानी ‘शोम्पेन हट’ नावाने मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं. या ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क तर बजावलाच शिवाय मतदार केंद्रावर त्यांनी फोटोही काढले. ओंगे आणि अंदमानीज लोकांनी २०१९ ला पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर यंदा शोम्पेन समाजाने पहिल्यांदाच आपलं नोंदवलं आहे. 98 शोम्पेन समाजाच्या लोकांनी मतदान केलं आहे.
शोम्पेन समाज हा अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित आहे. निकोबार बेटावर या समाजाचं वास्तव्य आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने हा समाज अद्याप मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्याचमुळे इतकी वर्षे या समाजाने मतदान केलं नव्हतं. २०११ साली झालेल्या जनगणनेत शोम्पेन समाजाच्या लोकांची संख्या २२९ होती.
यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या ऐतिहासिक घटनेची नोंद घेत या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचे कौतुक केले आहे. “अंदमान निकोबार बेटांवरील शोम्पेन समाजाच्या ९८ लोकांनी स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनी पहिल्यांदाच मतदान केलं. यापूर्वी ओंगे आणि अंदमानीज लोकांनी २०१९ ला पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशाच्या प्रत्येक घटकाला राष्ट्रीय प्रवाहात आणणाऱ्या मोदी सरकारचे कौतुक केलेच पाहिजे,” असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
अंदमान निकोबार बेटांवरील शोम्पेन समाजाच्या ९८ लोकांनी स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनी पहिल्यांदाच मतदान केलं.
यापूर्वी ओंगे आणि अंदमानीज लोकांनी २०१९ ला पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
देशाच्या प्रत्येक घटकाला राष्ट्रीय प्रवाहात आणणाऱ्या मोदी सरकारचे कौतुक केलेच पाहिजे… pic.twitter.com/UtN8TII79w— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) May 21, 2024
हे ही वाचा:
फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!
इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’
प्रज्वल रेवण्णाला आवाहन ‘घरी परत ये आणि चौकशीला सामोरे जा’
लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू
याशिवाय प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. शोम्पेन समाजाच्या व्यक्तीने मतदानानंतर काढलेला फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, “हा फोटो माझ्यासाठी २०२४ च्या निवडणुकीमधला सर्वोत्तम फोटो आहे. ग्रेट निकोबारमधील शॉम्पेन जमातीतील सातपैकी एक, ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं. लोकशाही आहे. ही एक अप्रतिम, न थांबवता येणारी शक्ती आहे,” असं आनंद महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
This, for me, is the best picture of the 2024 elections.
One of seven of the Shompen tribe in Great Nicobar, who voted for the first time.
Democracy: it’s an irresistible, unstoppable force. pic.twitter.com/xzivKCKZ6h
— anand mahindra (@anandmahindra) May 20, 2024