28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणसंजय राऊतांची रडारड; म्हणे ‘उबाठा’ला भरघोस मतदान होईल तिथेच कासव गतीने काम

संजय राऊतांची रडारड; म्हणे ‘उबाठा’ला भरघोस मतदान होईल तिथेच कासव गतीने काम

विरोधकांकडून निवडणूक आयोगावर टीका करत केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात राज्यात १३ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जागांचा सहभाग होता. अशातच काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याच्या तक्रारी सोमवारी मतदानाच्या दिवशी प्राप्त झाल्या होत्या. यावरून आता विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका करत केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत आरोपांची मालिका बोलून दाखविली आहे.

“मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का? अशी शंका वाटावी असं चित्र पाहायला मिळालं. जिथे जिथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल तिथंच कासव गतीने यंत्रणा चालू होती. भाजपाच्या किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथं टक्का वाढू शकतो तिथं कोणत्याही अडचणीशिवाय मतदान घडवण्यात आलं,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच जागृत होतो म्हणून त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, पैसे वाटप आम्ही पकडलं, मग काय करायचं? मग अशा पद्धतीने यंत्रणा ढिली करायची. चार-चार तास लोकांना रांगेत उभं करायचं. ही डिजिटल इंडिया आहे ना? याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं. फेल करण्यात आलं. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशापद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. आम्ही शेवटपर्यंत आवाहन केलं की रांग सोडू नका. पहाट झाली तरी चालेल. त्यामुळे अनेकठिकाणी रात्री ११ पर्यंत मतदान होऊ शकले,” असं संजय राऊत म्हणाले.

“निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन यंत्रणा भ्रष्ट करणे यात भाजपा, मिंधे गट, अजित पवार माहीर आहेत. मशालीला मतदान होण्याची शक्यता होती तिथं यंत्रणा बिघडवण्यात आली. मुंब्र्यात एका तासांत फक्त ११ च मतदारांनी मतदान टाकलं. मतदान प्रक्रियेवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. ही चूक आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा:

फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!

इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’

प्रज्वल रेवण्णाला आवाहन ‘घरी परत ये आणि चौकशीला सामोरे जा’

लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू

दरम्यान, संथ गतीने सुरू असलेल्या प्रक्रियेवर सोमवारीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देऊन ठाकरे गटावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत,” अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा