कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी सोमवारी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा याला भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सेक्स स्कँडल प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहून आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवावी, असा सल्लाही दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर प्रज्वल रेवण्णा (३३) कथित लैंगिक अत्याचार केलेले अनेक व्हिडीओ कर्नाटकमध्ये व्हायरल झाल्यानंतर तो तातडीने जर्मनीला रवाना झाला. प्रज्वल रेवण्णा यांनी हसन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. ते जनता दल (धर्मनिरपेक्षा) आणि भाजपचे संयुक्त उमेदवार होते. प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आले आहे. ते अद्याप पोलिसांना शरण न आल्यामुळे अखेर त्यांचे काका आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी त्यांना आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मतदानानंतर केंद्रावर आल्याने वाद; गोळीबारात एकाचा मृत्यू
इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे!
पंतप्रधान मोदींना मतदान करू नये, असे सांगणाऱ्या शिक्षकाला अटक
पुण्यातील पोर्शे मृत्यूप्रकरण; गदारोळानंतर अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून सुनावणी होण्याची शक्यता
‘तू कृपया भारतात परत ये आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचव. कृपया पोलिसांना शरण येऊन एसआयटीच्या तपासाला सहकार्य कर. तुझी काही चूक झाली नसेल तर भीती कशाची?’ असे आवाहन कुमारस्वामी यांनी केले आहे. ते आपला भाऊ एचडी रेवण्णा आणि त्याच्या कुटुंबाला खास प्रसंगी आणि सणांच्या वेळीच भेट घेतात. अन्यथा, आम्हाला एकमेकांच्या व्यवसायाबद्दल काहीही माहिती नाही, असे स्पष्टीकरणही कुमारस्वामी यांनी दिले आहे.काँग्रेस सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. तथापि, भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षांनी त्यांना सीबीआयकडे सोपवावे आणि हे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोन सरकार टॅप करत आहेत, असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे. मात्र उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी कुमारस्वामी यांनी केलेले फोन टॅपिंगचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना शिवकुमार आणि भाजप नेते जी देवराजे गौडा यांच्यातील कथित ऑडिओ टेपच्या संदर्भात कारवाई करण्याचे आवाहन केले. शिवकुमार यांनी कुमारस्वामी यांना सेक्स स्कँडल प्रकरणात अडकवण्यासाठी गौडा यांना पैसे देऊ केल्याचा दावा केला होता.