लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (२० मे) मतदान झाले.यावेळी उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये एका गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.गावातील लोकांची समजूत काढण्यासाठी राहुल गांधी गावात पोहचताच संतप्त गावकऱ्यांनी ‘जय श्री राम’, ‘हर हर महादेव’च्या घोषणा दिल्या.गावकऱ्यांचा संताप पाहून राहुल गांधी अखेर माघारी फिरले.
रायबरेली मधून निवडून येण्यासाठी राहुल गांधी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.पराभवाच्या भीतीने मतदारसंघातील जनतेला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.मात्र, रायबरेलीमधील एका गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मतदानावर बहिष्कार टाकणारे मिल एरिया पोलीस स्टेशन हद्दीतील मैनुपूर गावचे ग्रामस्थ आहेत.गावात रस्ता न झाल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी
छत्तीसगडमधील कावर्धा येथे पिकअप खड्ड्यात उलटली, १७ जणांचा मृत्यू!
शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षाला घातला हार, गुन्हा दाखल!
अहमदाबाद विमानतळावर इसिसशी संबंधित श्रीलंकन नागरिकांच्या मुसक्या आवळल्या
राहुल गांधी यांना याची माहिती मिळताच राहुल गांधीनी रायबरेली गाठले.राहुल गांधी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो अयशस्वी ठरला.संतप्त नागरिकांनी राहुल गांधी यांच्यासमोरच ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.आपला प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे कळताच राहुल गांधी यांनी जनतेला हात जोडून काढता पाय घेतला.या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.