आम आदमी पक्षाच्या महिला खासदार स्वाती मालवीय यांना केलेल्या मारहाणीवरून दिल्लीत राजकारण तापले आहे.यावरूनच आक्रमक भूमिका घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला.मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मोर्चावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान टीका केली आहे.मुख्यमंत्री केजरीवाल हे धूर्त असल्याचे ते म्हणालेत.मुख्यमंत्री केजरीवालांच्या पक्षाचा हा वाद असून भाजप कार्यालयावर मोर्चा काढत आहेत, केजरीवालांची ही नौटंकी असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.
एनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आम आदमी पक्ष अहंकारी पक्ष झाला आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अहंकारने भरलेले व्यक्ती आहेत.मारहाणीचे प्रकरण त्यांच्या पक्षाचे असल्याने त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे.विशेष म्हणजे त्यांच्या पार्टीची ती महिला खासदार आहे आणि हे अहंकारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.
हे ही वाचा:
गोंधळामुळे राहुल गांधी, अखिलेश यांचा भाषण न करताच काढता पाय!
‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखळीच्या बहिणींना दोष देत आहेत’
नक्षलवादी दिवाकर झाला १० वी पास, १४ लाखांचे डोक्यावर होतं बक्षीस!
ज्याला कुठला अनुभव नाही, पक्ष चालवता येत नाही अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसे करता?
#WATCH | Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says "Aam Aadmi Party has become 'Ahankari Aadmi Party'…Arvind Kejriwal should answer why is not speaking if a woman who is a Rajya Sabha member from your party has been assaulted by your people. She was not just verbally… pic.twitter.com/7u0NRmhjB0
— ANI (@ANI) May 19, 2024
तुमच्या पक्षातील लोक पार्टीच्या महिलांसोबत, बहिणीसोबत दूरव्यवहार करत आहेत, अशा गोष्टी आश्चर्यकारक असतात.दूरव्यवहार शब्दानेच केला जात नाहीतर चक्क मारहाण केली जात आहे.आपल्या राज्यसभा महिला खासदाराला न्याय द्यायचे सोडून दूरव्यवहार करणाऱ्याला वाचवण्याचे ते प्रयत्न करत आहेत.
शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, महिलांचा अपमान करणे हे भारतीय संस्कृती आणि संस्कारांमध्ये नाहीये.अरविंद केजरीवाल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हा तो भारत आहे जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला होता तेव्हा महाभारत घडले होते आणि दूरव्यवहार करणाऱ्यांचा विनाश झाला होता.ना तुम्ही वाचाल ना तुमची पार्टी आणि तुम्ही कसली नौटंकी करत आहात, पक्ष तुमचा, भांडणे तुमची आणि प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही आमच्या इकडे येत आहात.ही धूर्तता नाही तर काय आहे?, इमानदारीचे कपडे घालून राजनीतीमध्ये आलात.मात्र, सर्वात मोठे बेईमान आहात तुम्ही.त्यामुळे तुमचे काहीच भले होणार नाही.हा अहंकार आणि बेईमानी तुम्हाला एक दिवस घेऊन बुडवले, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.