प्रयागराजमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेत गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.जमाव अनियंत्रित होऊन बॅरिकेट्स तोडून स्टेजवर पोहचला.पोलिसांनी लाठीमार केला असता चेंगराचेंगरी झाली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना भाषण न करताच परत जावे लागले.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती.या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव संबोधित करणार होते.राहुल गांधी आणि अखिलेश यादव येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.दोन्ही नेते स्टेजवर पोहचताच समर्थकांनी बॅरेकेट्स तोडून आत प्रवेश केला.सर्व कार्यकर्ते स्टेजवर चढले.
हे ही वाचा:
‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखळीच्या बहिणींना दोष देत आहेत’
नक्षलवादी दिवाकर झाला १० वी पास, १४ लाखांचे डोक्यावर होतं बक्षीस!
ज्याला कुठला अनुभव नाही, पक्ष चालवता येत नाही अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसे करता?
मुंबईतील डॉ.निलेश दोशी अमेरिकेतील चार हजार डॉक्टरांना करणार संबोधित!
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.मात्र, कार्यकर्त्यांची वाढती गर्दी पाहून दोन्ही नेते संतापले आणि भाषण न करताच परतले.पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, यामध्ये चेंगरा-चेंगरी झाल्याने काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे.
फुलपूर लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अमरनाथ मौर्य यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आणि अखिलेश यादव आले होते. मात्र, समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला.यानंतर अखिलेश यादव हे संतापून निघून गेले.त्यांच्या पाठोपाठ राहुल गांधींनाही माघारी फिराव लागलं.