31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेष'शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत'

‘शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत’

पंतप्रधान मोदी बंगालमध्ये गरजले

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(१९ मे) पश्चिम बंगालमध्ये गर्जना केली. पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी पुरुलिया येथील एका सभेला संबोधित केले. या सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मी पुरुलियात मत मागण्यासाठी नाही तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.पंतप्रधान मोदींनी आरक्षणावरून इंडी आघाडीवर निशाणा साधला.यासोबतच तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवरही आरोप आले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने राज्यात येण्यासाठी माता, माती (जमीन) आणि मानवांचे रक्षण करण्याचे वचन देऊन राज्यात आली, परंतु तेच आता भक्षक बनले आहेत.संदेशखाली प्रकरणावरही त्यांनी टीएमसीवर हल्लाबोल केला. शहाजहान शेखला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, सत्तेत येण्यासाठी टीएमसीने महिलांना वचन दिले.मात्र तेच आता भक्षक बनले आहेत.बंगालच्या महिलांचा विश्वास आता टीएमसीवरून उठला आहे.संदेशखळीत घडलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण बंगालमधील बहिणींना विचार करण्यासाठी भाग पाडले आहे.शहाजहानला वाचवण्यासाठी टीएमसीचे लोक संदेशखालीच्या बहिणींना दोष देत आहेत आणि त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.ज्याप्रमाणे ही लोकं भाषेचा वापर करत आहेत, याचे उत्तर बंगालची प्रत्येक मुलगी आपल्या मताने देऊन टीएमसीचा नाश करेल.

हे ही वाचा:

धोनीच्या षटकाराने चेन्नई पराभूत!

तृणमूलनेता पोलिसांच्या ताब्यात; आठवीच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप

अफगाणिस्तानमध्ये भीषण पाऊस, पुरात ६८ जणांचा मृत्यू

किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याच्या सूचना

ते पुढे म्हणाले, जिथे बंगालमध्ये माता सरस्वतीची पूजा केली जाते, तिथे टीएमसी सरकार शिक्षणातही चोरी करत आहे.शिक्षक भरतीत त्यांनी हजारो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले. ते पुढे म्हणाले की बंगालच्या लोकांना घाबरवणाऱ्या आणि निवडणुकीदरम्यान हिंसाचार भडकवणाऱ्या टीएमसी सरकारने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा