अफगाणिस्तानमधील घोर प्रांतात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात पूर आल्याने ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ही प्राथमिक माहितीवर आधारित असून ती वाढण्याची भीती आहे, अशी माहिती तालिबानच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
घोर प्रांतातील अनेक जण बेपत्ता झाले आहेत. येथे अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याचे घोर प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते अब्दुल वाहिद हमास यांनी सांगितले. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती ओढवली. त्यामुळे राजधानी फिरोज कोहसह विविध ठिकाणी हजारो घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील शेतजमिनीलाही फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उत्तरेकडील प्रांत फरयाबमध्ये १८ जण मृत्युमुखी पडले आणि दोघे जखमी झाल्याचे प्रांतीय गव्हर्नरचे प्रवक्ते एस्मातुल्ला मोरादी यांनी सांगितले.
हेही वाचा :
किर्गिझस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच थांबण्याच्या सूचना
मालीवाल यांच्यावरील हल्ला जीवघेणा असू शकतो
बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!
उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!
चार जिल्ह्यांमधील संपत्ती आणि जमिनीचे नुकसान झाले असून ३००हून अधिक प्राणी मारले गेले आहेत. पुरामुळे घोर भागाला मोठा फटका बसला आहे. येथील सुमारे अडीच हजार कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. पश्चिमेकडील फराह आणि हैरात आणि दक्षिणी जाबुल आणि कंधार प्रांतात सुमारे दोन हजार घरे, तन मशिदी आणि चार शाळा या पुराच्या पाण्यामुळे नेस्तनाबूत झाल्या.