दादरमधील मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे.धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने कॉल करून दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तो बेस्ट बस क्रमांक ३५१ मध्ये प्रवास करत होता त्यावेळी दोन व्यक्तींचे संभाषण ऐकले ज्यामध्ये ते मॅकडोनाल्ड उडवण्याबाबत बोलत होते.
शनिवारी(१८ मे) रात्री कॉलरने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली.पोलिसांनी सांगितले की, एका व्यक्तीने कॉल करून सांगितले की, बस मधून प्रवास करत असताना दोन व्यक्ती आपापसात बोलत होते.ते दोघे जण दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट करण्याबाबत बोलत होते.यानंतर याबाबतची माहिती कॉलरने मुंबई पोलिसांना दिली.
या कॉलनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. रात्रभर पोलीस बॉम्ब शोधण्यात व्यस्त होते. सखोल तपास करूनही पोलिसांना अद्याप एकही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकालाही सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. मुंबई पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास सर्वांनी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा:
उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!
बहारिनमध्ये सैफुद्दीनचा हिंदू महिलेवर बलात्कार!
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!
कन्हैय्या कुमारला मारणाऱ्यांना कोणताही पश्चात्ताप नाही!
कॉलची चौकशी सुरू
सध्या मुंबई पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना किंवा कॉल आल्यास गांभीर्याने घेण्याचे आदेश आहेत. याशिवाय मुंबई पोलीस या फोन कॉलच्या अधिक तपासात गुंतले आहेत. मात्र, मुंबई पोलिसांसाठी हे काही नवीन नाही. मुंबईत धमकीचे फोन येत आहेत. ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्रीही मुंबई शहर उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. त्यादिवशीही संपूर्ण शहरात बॉम्बस्फोटाच्या बातम्या आल्याने मुंबई पोलीस हादरले होते.