लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांत ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला मुंबई पोलिसांनी १९ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकुण २७५२ पोलीस अधिकारी, २७४६० पोलीस अंमलदार, ६२०० होमगार्ड, ०३ दंगल काबु पथक (आरसीपी), ३६ केंद्रिय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. १६ मे पासून आतापर्यंत विविध कायद्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी ८०८८ लोकांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच, मतदान केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत मुंबई पोलिसांना सहकार्य करावे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा:
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात
भाजपावर खापर फोडत केजरीवालांनी केली ‘जेल भरो’ची घोषणा
काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुंबई पोलिसांनी १९ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. तसेच, ३९१ अवैध शस्त्र हस्तगत केले होते. २०४ जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले. विविध खटल्यांमध्ये अनुपस्थित राहिल्याबद्दल पाच हजार आरोपींविरोधात न्यायालयाने जारी केलेली पाच हजार अजामीनपात्र वॉरंटची बजावली. आठ हजार गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांकडून फौजदारी दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार हमीपत्र घेण्यात आले.
पाच हजारांहून अधिक जणांना नोटीसा धाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात शहरातून ३९१ अवैध शस्त्र, सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा अवैध दारूसाठा, १० कोटी ५१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि तब्बल ४० कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले होते.