लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत प्रचाराचे वारे जोरदार वाहत असतानाचं शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगलेला पाहायला मिळालेला. एकीकडे महायुतीचे सर्व नेते प्रचारसभेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने त्यांचे नेते एकत्र आले होते. अशातच ईशान्य मुंबईचे महायुतीचे आणि भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयासमोर राडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्या मुलुंडमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला असून तो ठाकरे गटाकडून झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मिहीर कोटेचांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
या राड्याप्रकरणी मिहीर कोटेचा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मानखुर्दचे नवाब संजय दिना पाटील; पंतप्रधानांच्या सभेसाठी सगळे शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतरांनी वॉररूमवर भेकड हल्ला केला. कार्यकर्त्यांना मारहाण केली. शपथ घेतो. निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे, ड्रग्ज, मटका, गुटखा हे बंद करणारच. मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच,” असं थेट आव्हान मिहीर कोटेचा यांनी दिले आहे.
मुंबईकरांना आता ठरवायची वेळ आलीये की लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचा की तुमचा सेवक पाठवायचाय?@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/qXfop1ptX8
— Mihir Kotecha (Modi Ka Parivar) (@mihirkotecha) May 17, 2024
हे ही वाचा:
निकालाला विलंब होऊ नये म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ब्राझीलवरून परतताना विमानात तयार केला मसुदा
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला
केजरीवाल यांनी न्यायालयात आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे
कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण
शुक्रवारी महायुतीची मुंबईत सभा चालू असताना मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात मोठा राडा सुरू झाला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. यानंतर कार्यालयासमोर भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे काम सुरू आहे.