मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची आज सभा पार पडली.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच मंचावर उपस्थित होते.सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या.विरोधकांवर टीका करताना म्हणाले, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्याबद्दल का बोलावे?.तसेच ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं, देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही, अशी मागणी देखील पंतप्रधान मोदींकडे केली.
सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आपण मुंबई मध्ये बऱ्याचदा आलात.पण तब्बल २१ वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावर आलात.आपण या ठिकाणी कमळामधून बाहेर आला होतात.आणि २०१४ ला आपण कमळ बाहेर काढलंत.मी आज फक्त तीन टप्प्यामध्ये बोलणार आहे. त्यापैकी एक टप्पा झालेला आहे.मोदीजींची पहिली पाच वर्षे हा यातील पहिला टप्पा होता.यावर २०१९ मध्ये मी बोललो आहे.उरली आता गेली पाच वर्षे, मला असं वाटत देवेंद्रजी, मुख्यमंत्री, अजित दादा इतर सर्वानी उद्धव ठाकरे, शरद पवार इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला.मला तर असे वाटते जे सत्तेत येणारच नाहीयेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो?.काही आवश्यकता नाही.
ते पुढे म्हणाले, ९० च्या दशकात बाबरी मशिदीचे प्रकरण मोठं घडलं होत, हजारो कार सेवक उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावर मुलायम सिंगच्या लोकांनी आमच्या कारसेवकांना ठार मारले.प्रेतं फेकून दिली.ते अजूनही चित्र माझ्यासमोर आहे.बाबरी मशिदीचा ढाचा पडला, पण नुसतं राम मंदिर बनवू अशा बातम्या येऊ लागल्या.मला असे वाटलं की कदाचित राम मंदिर बनणारच नाही.परंतु मोदींजीं तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण तुम्ही होतात म्हणून अयोध्येला राम मंदिर बनू शकलं.अन्यथा ते झालच नसत.
पूर्वीचा इतिहास, भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास तेव्हापासून एकच गोष्ट कानावर पडायची ती म्हणजे काश्मीर मधलं कलम-३७० रद्द झाले पाहिजे.इतक्या वर्षात ती घटना घडली नाही ते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर करून दाखविली.त्याच काश्मीर मध्ये तुम्ही जाऊ शकता, त्या ठिकाणी जमीन खरेदी करू शकता, तो एक भारताचाच भाग आहे हे आता सिद्ध झालं.
राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा एक मोठी केस झाली होती, एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होत, आणि सुप्रीम कोर्टाने निकाल शाहा बानो यांच्या बाजूने लावला होता.सुप्रीम कोर्टाकडून बानो या महिलेला मिळालेला न्याय राजीव गांधी यांनी आपल्या बहुमताच्या ताकदीवर काढून टाकला.एका छोट्या पोटगीसाठी त्या महिलेला न्याय मिळवू शकला न्हवता.मात्र पंतप्रधान मोदींनी ट्रिपल तलाक रद्द करून टाकला आणि हिंदुस्तानातील सर्व मुस्लिम महिलांना न्याय मिळाला.
हे ही वाचा:
‘भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टपणा’
“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”
काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला
‘विदेश दौऱ्याचे तिकीटही बुक झाले, खटाखट-खटाखट’
पुढच्या पाच वर्षांमध्ये आपच्या सर्वांच्या खूप अपेक्षा आहेत.त्यामधील एक म्हणजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा.आणि पंतप्रधान मोदीजी हे करतील अशी मला अपेक्षा आहे.दुसरी गोष्ट म्हणजे, देशाच्या अभ्यासक्रमामध्ये, या देशावर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केलं.या हजारो वर्षांमध्ये १५० वर्षे मराठा साम्राज्य होत.त्या मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये शिकविला जावा, जेणेकरून हा देश कसा उभा राहिला हे भविष्यातील मुलांना कळेल.
तिसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहील, नाय राहील मला माहित नाही.पण माझी विनंती आहे, छत्रपती शिवरायांची स्मारके जर कुठली असतील तर ते शिवरायांचे गडकिल्ले आहेत.या गडकिल्ल्याना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त व्हावं यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी.भविष्यातील येणाऱ्या पिढयांना कळेल की आमचा राजा कोण होता, कसा होता हे गडकिल्ल्यामधून कळेल मधून त्यासाठी माझी ही विनंती आहे.मुंबई गोवा मार्ग अजूनही तसाच असून या मार्गाचे काम पूर्ण करावा अशी माझी विनंती आहे.
ते पुढे म्हणाले, तुम्ही इतर वेळी सांगितलं आहे, तर आता पून्हा एकदा खडसावून सांगा की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभे केलेलं संविधान आहे, त्याला कोठेही धक्का लागणार नाही, तुम्ही लावणार कधीच न्हवतात.पण विरोधक ज्या प्रमाणे प्रचार करत आहेत, मला अस वाटत त्यांची तोंड एकदाची बंद व्हावीत जेणेकरून परत त्यांची तोंड उघडणारच नाहीत.
या देशामध्ये अनेक मुसलमान आहेत, देशावर प्रेम करतात, देशावर त्यांची निष्ठा आहे, त्यांना सांगायची काही गरज नाही. पण काही मूठभर आहेत, जे आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत.गेल्या १० वर्षात त्यांना डोके वरती काढता नाही आलं.डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही.म्हणून ते आज त्या सर्वाना पाठिंबा देत आहेत.परंतु लाखोंच्या संख्येने आपल्यासोबत असलेल्या मुसलमानांना एक शाश्वती पाहिजे, त्याला मनात आदर आहे.तो कामधंदेवाला आहे,त्याला काम या देशात काम करायचे आहे.देशाचा नागरिक आहे, पिढ्यानपिढ्या राहणार आहे.पण मला असे वाटतं की हे जे मूठभर आहेत, या ओवैसी सारख्या औलादी आहेत यांच्या मागून फिरणारी जी लोकं आहेत.ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.