मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महापालिका आयुक्तांनी अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान मनपाच्या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश परिधान करून काम करण्याचे आदेश दिले होते.त्यासाठी सर्वांना लष्कराचा गणवेशही देण्यात आला होता. हे गणवेश परिधान करून कर्मचारी रस्त्यावर उतरले मात्र त्यावरून वाद निर्माण होताच अखेर महापालिकेला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
इंदूर महापालिकेने अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लष्करासारखा गणवेश उपलब्ध करून दिला होता.महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांच्या आदेशानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लष्करासारखा गणवेश परिधान करून रस्त्यावर उतरले.नवीन गणवेश परिधान केलेल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.यानंतर अनेकांनी आक्षेप घेत महापालिका लष्कराचा अवमान करत असल्याचे म्हटले.
हे ही वाचा:
होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे
आचार्य मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरख्यावर बंदी
उबाठा नेत्याच्या डोक्यावर महाराजांचे जिरेटोप कसे चालतात ?
फडणवीसांनी पोलखोलचं केली; अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं झालेलं काय?
वाढत्या विरोधामुळे अखेर महापालिका प्रशासनाला गणवेशात सुधारणा करण्याचा निर्णय घ्यावा लागला.याबाबत माहिती देताना महापौर पुष्यमित्र भार्गव म्हणाले की, महापालिकेकडून अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नवीन गणवेशामुळे माजी सैनिकांच्या भावना जर दुखावत असतील, तर गणवेशात बदल केले जातील, आणि बदल केलेच जातील, असे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी म्हटले.
दरम्यान, लष्कराच्या गणवेशाबाबत महापालिका प्रशासनाचे मत आहे की, “असा गणवेश परिधान केल्याने सर्वसामान्यांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेगळी छाप निर्माण होते. अनेकवेळा अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान वाद, हाणामारी होते, त्यावेळी वाद घालता येत नाही.त्यामुळेच महापालिका आयुक्त शिवम वर्मा यांनी त्यांच्या हाताखालील महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा गणवेश उपलब्ध करून दिला होता.