26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाहोर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले

मुंबई पोलिसांनी उदयपूरमधून केली अटक

Google News Follow

Related

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत होर्डिंग कंपनीचा फरार मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

युनिट ९ ने उदयपूर येथून भिंडेला ताब्यात घेतले आहे. आपल्या भावाच्या नावे त्याने हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. पोलिसांनी त्याचा अचूक माग काढत त्याला जेरबंद केले आहे.

हे ही वाचा:

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

तीन तलाकमुळे संसार तुटला, केले हिंदू युवकाशी लग्न

सीएए बद्दल खोटी माहिती पसरवून देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न

 

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे हे होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपावर कोसळले होते. त्यात १६ लोकांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग अनधिकृत होते आणि पालिकेची त्याला परवानगी नव्हती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या होर्डिंगला तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची परवानगी असल्याचा आरोप केला.

भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूर येथे हॉटेल बुक करून त्या ठिकाणी लपून बसला होता. मुंबई गुन्हे शाखेने भिंडे याचे लोकेशन शोधून काढत गुरुवारी त्याला ताब्यात घेऊन मुंबई कडे रवाना झाले आहे.

या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा मुंबईतून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पंतनगर पोलीस ठाण्याचे २पथके आणि मुंबई गुन्हे शाखेचे दोन पथके असे एकूण चार पोलिसांचे पथक भिंडे याचा शोध घेत होते.

भिंडे यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन पुण्यातील लोणावळा येथे दाखवत होते. पोलिसांनी पथक त्या लोकेशनवर पोहचले असता, भावेश भिंडेने तेथून पळ काढला होता. लोणावळा येथून त्याने थेट राजस्थान उदयपूर गाठले, त्या ठिकाणी त्याने भाच्याच्या नावावर एक हॉटेल मध्ये खोली बुक करून त्या ठिकाणी राहत होता. मुंबई गुन्हे शाखेला भावेश भिंडे याचे लोकेशन ट्रेस होताच कक्ष ९ चे पथक उदयपूर येथे रवाना झाले आणि गुरुवारी भावेश भिंडे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पथक भिंडे याला घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून शुक्रवारी भिंडे ला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा