25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषश्रीनगरमध्ये ऐतिहासिक ३८ टक्के मतदान!

श्रीनगरमध्ये ऐतिहासिक ३८ टक्के मतदान!

१९९६नंतर सर्वाधिक मतदान; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या मतदानावेळी कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. यावेळी ऐतिहासिक ३८ टक्के मतदान झाले. सन १९९६नंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे. याआधी सन १९९६मध्ये जम्मू काश्मीरच्या या जागेवर सुमारे ४१ टक्के मतदान झाले होते. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेच्या कलम ३७० हटवल्यानंतर श्रीनगर मतदारसंघात झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होती. निवडणूक आयोगानुसार, रात्री ११ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, येथे ३८ टक्के मतदान झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्साहवर्धक मतदानासाठी श्रीनगरच्या मतदारांचे कौतुक केले. ‘कलम ३७० हटवल्यानंतर लोकांची क्षमता आणि आकांक्षांना संपूर्ण अभिव्यक्ती मिळू शकली आहे. हा बदल तळागाळात दिसत असून जम्मू आणि काश्मीरचे नागरिक विशेषतः तरुणांसाठी ही खूप चांगली बाब आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे कौतुक केले.

हे ही वाचा:

रास्व संघाचा नेता रुद्रेशची हत्या केल्यानंतर पीएफआयकडून हिंदूंना मारण्यासाठी ‘डेथ स्क्वॉड’ची उभारणी!

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा

पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणारा नांदेडमधून ताब्यात

ऐतिहासिक मतदानासाठी उपराज्यपालांनीही केले कौतुक
जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि राजकीय पक्षाने श्रीनगर मतदारसंघातील या मतदानाला ऐतिहासिक असे संबोधून मतदारांचे कौतुक केले. मतदारसंघाचे काश्मिरी पंडित विशेष मतदान केंद्रांवर पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या ‘सामाजिक, आर्थिक व राजकीय’ मुद्द्यांवर त्यांच्या समुदायाच्या पुनर्वसनासाठी मतदान केले. श्रीनगर मतदारसंघाअंतर्गत श्रीनगर, गांदेरबल, पुलवामा, बडगाम व शोपिया जिल्ह्यातील दोन हजार १३५ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

श्रीनगरमध्ये १९९६मध्ये ४१ टक्के मतदारांनी केले होते मतदान
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३४ वर्षांत या मतदारसंघातील सर्वाधिक मतदान १९९६मध्ये झाले होते. तेव्हा ४१ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता. सन २०१९मध्ये येथे १४.४३ टक्के मते पडली होती, तर २०१४मध्ये २५. ८६ टक्के, २००९मध्ये २५.५५ टक्के, २००४मध्ये १८.५७ टक्के, १९९९मध्ये ११.९३ टक्के आणि १९९८मध्ये ३०.०६ टक्के मतदान झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा