देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून निवडणुकीचा चौथा टप्पा सध्या पार पडत असून यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदार संघात मतदान होत आहे. जळगाव, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, रावेर, शिर्डी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. या अकरा जागांवर महायुती विजयी होईल असा विश्वास व्यक्त करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा फुटणार आहे. मशाल आणि तुतारी हे दोन पक्ष ४ जूननंतर राज्यात दिसणार नाहीत,” अशी घाणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यात महायुतीला केवळ दहा जागा मिळतील अशा आशयचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. तसेच नाशिक महापालिका हद्दीतील ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार, असं देखील ते म्हणाले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांच्या शिवाय बाकी प्रश्न सुद्धा आहेत. सकाळी ते बोलले म्हणून आम्ही बोलले पाहिजे असे काही नाही. काही प्रश्न विकासाचे असतात, असा टोला असे त्यांनी यावेळी म्हटले.
हे ही वाचा:
पक्ष फोडला, उद्योग नेले यावरून मुलाखतीत उद्धव ठाकरेंची रडारडी
लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघाचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!
‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे त्यांनी म्हटले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, जेव्हा पराभवाचे लक्षणं दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणं नॉर्मल आहे. ते बोलतच राहणार, पराभव जसा जवळ दिसेल, ईव्हीएम खराब आहे. मशीन खराब झाली आहे. मशीनमध्ये दोष आहे, असे आरोप ते करणारा.