32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरराजकारणलोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघाचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघाचे भवितव्य मतपेटीत होणार बंद

अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

Google News Follow

Related

देशात सध्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेचं लोकसभेची निवडणूक पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालिया आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. १ जून पर्यंत देशात लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पडणार आहेत. तसंच ४ जूनच्या दिवशी निकाल असणार आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत सोमवारी मतदान होणार आहे. राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड आणि अहमदनगर या मतदारसंघांतील प्रचाराचा धुराळा शनिवारी शांत झाला. देशातील १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदार संघात १७.७ कोटी मतदार आहेत. ते १.९२ लाख मतदान केंद्रांवर मतदान करून १ हजार ७१७ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांच्यात लढत आहे. हा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, रविंद्र धंगेकर यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. बीड लोकसभा मतदार संघात भाजपाने पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे ही रिंगणात आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदार संघात यंदा शरद पवार यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटातील शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होणार आहे.

हे ही वाचा:

केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!

‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’

बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे मैदानात आहेत. तर, वंचितचे अफसर खान आणि एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील तसेच अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव देखील उभे आहेत. जालन्यात भाजपाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे अशी लढत आहे. तर, नगर लोकसभा मतदार संघात यंदा भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रसचे नीलेश लंके यांच्या लढत होणार आहे. अशा अनेक प्रतिष्ठित लढती चौथ्या टप्प्यात पार पडणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा