अभिनेत्री करिना कपूरने लिहिलेल्या एका पुस्तकावरून आता वाद निर्माण झाला आहे. करिना कपूर खान्स प्रेगनन्सी बायबल असे या पुस्तकाचे नाव आहे. यावरून एकाने मध्य प्रदेशात खटला दाखल केला आहे. या पुस्तकाच्या नावात बायबल हा शब्द वापरल्यावरून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
ऍड. ख्रिस्तोफर अँथनी यांनी मध्य प्रदेशात हा खटला दाखल केला आहे. ख्रिस्ती समाजाचा अपमान यातून होत असल्याचे अँथनी यांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करिना कपूरला नोटीस बजावली आहे.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?
“नरेंद्र मोदीचं २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहणार”
विजय वडेट्टीवारांना हेमंत करकरेंबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
मोबाईलवरून फसवणुकीचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी सरकार सरसावले
जबलपूरमधील सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अँथनी यांचे म्हणणे आहे की, बायबल हे नाव वापरून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. यातून बायबलचा अपमान होतो.
२०२१मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यावेळीही ख्रिस्ती समुदायाने करिना कपूरविरोधात तक्रार केली होती. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने ही तक्रार केली होती. ख्रिश्चनांच्या भावना यामुळे दुखावल्याचा दावा करण्यात आला होता.