24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष'करो या मरो' सामन्यात ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी

‘करो या मरो’ सामन्यात ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी

Google News Follow

Related

आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली पुढचा सामना आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी ‘करो या मरो, नाहीतर सामान भरो’ अशा काहीशा स्थितीत आहे. संघ अडचणीत असताना संघाचा म्होरक्या ऋषभ पंत हा सामना खेळणार नाही. त्यामुळे दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर स्लो ओव्हर रेटच्या दंडामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे तो आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नाही. प्लेऑफच्या शर्यतीत आपल्या सरदारालाच शस्त्र खाली ठेवावे लागल्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला स्लो-ओ्हर रेटसाठी दोषी ठरवले होते. यापूर्वी पंतने दोनवेळा स्लो ओव्हर रेटमुळे लाखो रुपयांचा दंड भरलेला आहे.

हेही वाचा :

विश्वंभर चौधरींनी पळ काढला

सलीम मलिकची विशेष रजा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम

“काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय”

पंतला ३० लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी

आयपीएलच्या नियमानुसार, पहिल्या वेळेस पंतला स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाख रुपयांचा दंड भरावा लागला होता. दुसऱ्या वेळेस संथ गतीने षटक टाकल्याबद्दल २४ लाख रुपये दंड झाला होता. नियमांनुसार, जर एखाद्या संघाने तिसऱ्यांदा असे केले तर कर्णधाराला ३० लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदीला सामोरे जावे लागते. ऋषभ पंतच्या संघाने ही चूक तिसऱ्यांदा केल्यामुळे त्यांना हा फटका बसलेला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे केवळ पंतलाच नाही तर इतर सर्व खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

आरसीबी विरुद्धचा महत्त्वाचा सामना

येत्या रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. एकीकडे दिल्ली कॅपिटल्स १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीचे सध्या १० गुण आहेत आणि ते सातव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना पुढचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. जर दिल्लीने विजय मिळवला तर त्याची टॉप-४ मध्ये येण्याची शक्यता वाढेल. ज्यामुळे आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. पण ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मार्ग दिसतो तसा सोपा वाटत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा