24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामालव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

लव्ह जिहादचे प्रकरण; हिंदू असल्याची बतावणी करून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

जयपूरमधील घटना; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Google News Follow

Related

राजस्थानची राजधानी जयपूरमधील शिप्रा पथ येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. शिप्रा पथ पोलीस ठाणे परिसरात लव्ह जिहादचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पीडित महिला ही सांगानेर येथील रहिवासी असून तिला लव्ह जिहादचे लक्ष्य करण्यात आले आले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत शिप्रा पथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे. सलमान खान असे आरोपीचे नाव आहे.

प्रेमाच्या बहाण्याने २५ वर्षीय हिंदू महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी सलमान खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. जयपूरमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या सलमान खानने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आपण हिंदू असल्याचे भासवले. अहवालानुसार, त्याने २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला, अश्लील व्हिडिओ शूट केला आणि नंतर पीडितेला ब्लॅकमेल करून २ ते ४ लाख रुपयांची मागणी केली. तसेच अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पीडितेला तिच्या इच्छेविरुद्ध दिल्लीला घेऊन गेला. महिलेच्या कुटुंबीयांनी शिप्रा पथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून पीडितेला दिल्लीतून आणले आणि तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांनी दिल्लीतून सलमान खानलाही अटक केली. तपासादरम्यान असे उघड झाले की, आरोपीनी यापूर्वी अशाच पद्धतीचा वापर करून इतर तीन- चार हिंदू महिलांना अडकवले होते. पोलिसांनी सलमान खानचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. सध्या आरोपीची अधिकची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १६४ अंतर्गत पीडितेचा जबाबही नोंदवला.

हे ही वाचा

पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मॅनेजरचे निलंबन; मतदानाच्या आदल्या रात्री खुली होती बँक

जिवंतपणी काय मृत्यूनंतरही तुम्ही मला जमिनीत गाडू शकत नाहीत!

दाभोलकर हत्येच्या निकालातून काय समोर येणार?

नांदेडमध्ये आयकर विभागाची पाच ते सात ठिकाणी छापेमारी!

या प्रकरणाबाबत बोलताना शिप्रा पथ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की, “पीडित मुलगी पाच सहा वर्षांपूर्वी आरोपीला पहिल्यांदा भेटली होती. सलमान खान आठवी नापास असून मूळचा अजमेरचा रहिवासी आहे. त्याने तिच्या नावावर स्कूटीही खरेदी केली होती.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा