24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषलाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?

लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?

अभिनेत्री केतकी चितळेचा सवाल

Google News Follow

Related

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले असून चौथ्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा जोरात सुरु आहेत.सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.याच मालिकेत अभिनेत्री केतकी चितळे देखील सहभागी झाली आहे.महाविकास आघाडीचे नेते अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत बॉम्बब्लास्ट मधील आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला होता.यावरून उद्धव ठाकरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न अभिनेत्रीने केला आहे.

उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार सभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये १९९३ च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा प्रचार सभेत फिरताना दिसला होता.या प्रचार रॅलीचा व्हिडीओ भाजपच्या हाती लागल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका करत धारेवर धरलं.यावरून आता अभिनेत्री केतकीने देखील तशीच टीका करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’

रिकामं डोकं कुलगुरूंची अक्कल काढते तेव्हा..

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन नाहीच

पाकव्याप्त काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये निदर्शने

अभिनेत्री केतकीने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्या वेळी ट्रक टायर फुटले असावे, असे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय?!!किर्तीकरांना तसेही मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१% आदर मनात होता तुमच्याविषयी, तो ही तुम्ही मातीत मिळविणास यशस्वी झालात.राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा