पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी(१० मे) नंदुरबारमध्ये सभा पार पडली.सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, शिवसेनावाले ( ठाकरे) गरिबांचा किती द्वेष करतात हे कालच त्यांनी दाखवून दिले.हे नकली शिवसेना वाले मला जिवंत गाडण्याची भाषा करत आहेत.मात्र, माझ्यावर मातृशक्तीचा आशीर्वाद असल्यामुळे मला जिवंतपणी काय तर मृत्यूनंतरही जमिनीत गाडू शकत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एका बाजूला काँग्रेस आहे, जी म्हणते- मोदी तुमची कबर खोदणार, तर दुसरीकडे ही खोटी शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करत आहेत.मला शिवीगाळ करताना हे लोक तुष्टीकरणाची पूर्ण काळजी घेतात. व्होट बँक खुश करण्यासाठी तुम्ही मला शिव्या द्याल का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, मला गाडण्याची भाषा करता?, बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. याबाबत बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल, याचा विचार करून मला वेदना होतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.हे नकली शिवसेनेवाले बॉम्बस्फोटातील आरोपीला सोबत घेऊन फिरत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”
‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’
११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप
‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’
ते पुढे म्हणाले, मातृशक्ती माझे कवच आहे.माझ्यावर मातृशक्तीचा आशीर्वाद असल्यामुळे लोकांना हवे असले तरी ते मोदींना जिवंतपणी किंवा मरणानंतरही जमिनीत गाडू शकत नाहीत.देशातील १४० कोटी जनता माझ्यासोबत असल्याचे ते लोक विसरले आहेत.हे लोक माझे रक्षक आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.