30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?

मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?

Google News Follow

Related

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी या पत्रातून केली आहे.

मनमोहन सिंग यांनी या पत्रातून नरेंद्र मोदी यांचं कोविडमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. एकून पाच मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेलं नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिलेलं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेलं नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकललं आहे. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

हे ही वाचा:

कोरोना आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही

मोदी सरकारकडून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरु

कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल

देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

पुढच्या सहा महिन्यांसाठी लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसींचं राज्यांना वितरण कसं होणार? याबाबतची माहिती दिली पाहिजे. जर आपल्याला वेळेत लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पुरेश्या प्रमाणात ऑर्डर दिली पाहिजे. त्यामुळे लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही त्यावेळेत उत्पादन करणं शक्य होईल, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा